आकर्षक सजावट, मनमोहक गणेशमूर्ती आणि रांगोळीने वेधले लक्ष; विद्यार्थी-प्राध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग
जळगाव | The Citizen Mirror Education Desk
गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात सर्वत्र भक्तिमय जल्लोष सुरू झाला असून, डॉ. उल्हास पाटील गोदावरी विधी महाविद्यालयातही लाडक्या गणरायांचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, ‘बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला.
महाविद्यालयात अत्यंत आकर्षक आणि मनमोहक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. कल्पकतेने साकारलेल्या सजावटीमुळे तसेच प्रसन्न मुद्रेतील गणेशमूर्तीमुळे परिसराला विशेष भक्तिमय आणि उत्सवी स्वरूप प्राप्त झाले.
डॉ. ललिता सपकाळे-निकुंभ आणि कलेश निकुंभ यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या निनादात गणरायांची आरती करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी भक्तिभावाने आरतीमध्ये सहभाग घेत गणरायांचे दर्शन घेतले.
कल्पक सजावटीतून साकारला भक्तिमय परिसर
प्राचार्या डॉ.नयना झोपे-महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाचे नियोजन करण्यात आले. जी.एस. अक्षय रिठे आणि गणेशोत्सव समन्वयक पवन सोनवणे यांनी कल्पकतेतून आकर्षक डेकोरेशन साकारले. दीपक खडके यांनी प्रसन्न मुद्रेची गणेशमूर्ती उपलब्ध करून दिली, तर कल्याणी चौधरी यांनी सुंदर रांगोळी साकारून सजावटीत अधिकच आकर्षक भर घातली.
गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी यज्ञेश सोनवणे, अभिनव भावसार, ऋषिकेश सोनार, दिनेश बाविस्कर, भूषण पवार, प्रणव पाटील आणि रुपाली तायडे यांनी विशेष मेहनत घेतली.
विद्यार्थी-प्राध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग
गणेशोत्सवाच्या या मंगलमय सोहळ्याला डॉ. केतकी पाटील, ॲड. शैलेश नागला, पूजा व्यास, प्रदीप महाजन, अमोल चौधरी, ईश्वर राणे आणि विनोद धांडे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणरायांच्या आगमनाने महाविद्यालय परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी गणेशोत्सवाच्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.














