Category: जळगांव
-

जळगाव तालुक्यात १३ हजार रेशन कार्डधारकांची नावे कमी; ई-केवायसी करून पात्र लाभार्थ्यांनी लाभ कायम ठेवण्याचे आवाहन
जळगाव | The Citizen Mirror Desk सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांनाच शासकीय अन्नधान्याचा लाभ मिळावा, तसेच दुबार, मयत, अस्तित्वात नसलेल्या आणि अपात्र लाभार्थ्यांची नावे शिधापत्रिकेतून कमी व्हावीत, यासाठी शासनाकडून शिधापत्रिकांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत जळगाव तालुक्यात आतापर्यंत सुमारे १३ हजार नावे कमी करण्यात आली असल्याची माहिती पुरवठा निरीक्षण अधिकारी रंजना बहादे…
-

दहावीतील नेहाचा अचानक मृत्यू!
पोटातील गाठ कारणीभूत, उपचारातील हलगर्जीपणा की आणखी काही…? मृत्यूमागचे नेमके सत्य समोर येणार का? भुसावळ |राजेश तायडे सकाळी पोटात दुखत असल्याची तक्रार करणारी दहावीतील विद्यार्थिनी काही तासांतच उपचारादरम्यान जगाचा निरोप घेते, ही घटना कोणत्याही पालकाच्या काळजाचा ठोका चुकवणारी आहे. भुसावळच्या रेल्वे उत्तरवाड परिसरातील दादासाहेब रूपवते हाऊसिंग सोसायटी येथे राहणाऱ्या कु. नेहा संतोष सोनवणे हिच्या अचानक…
-

भुसावळातील प्रभाग क्रमांक १७च्या समस्यांकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष?
वारंवार निवेदने देऊनही प्रश्न जैसे थे; अखेर नागरिकांचे लक्षवेधी निवेदन मंत्री संजय सावकारे यांच्याकडे भुसावळ | राजेश तायडे भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील विविध समस्यांबाबत नगरपालिका प्रशासनाकडे निवेदने देऊनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने संतप्त नागरिकांनी आता थेट…
-

रेल्वे बोर्डाचे सदस्य पवन कुमार गुप्ता यांची भुसावळ DRM कार्यालयाला अचानक भेट; ऑल इंडिया SC-ST असोसिएशनतर्फे स्वागत
भुसावळ |राजेश तायडे भुसावळ रेल्वे विभागात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे आणि मुंबई रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक (GM) म्हणूनही जबाबदारी सांभाळलेले रेल्वे बोर्डाचे विद्यमान सदस्य पवन कुमार गुप्ता यांनी भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) कार्यालयाला अचानक सदिच्छा भेट दिली. त्यांच्या अनपेक्षित भेटीमुळे रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. पवन कुमार गुप्ता यांनी भुसावळ रेल्वे विभागात…
-

“महादेवाच्या आशीर्वादाने आमदार ते मंत्री झालो”; आरक्षित मतदारसंघातून निवडून आलेल्या सावकारेंच्या वक्तव्याने आंबेडकरी विचारवंतांमध्ये आश्चर्य
भुसावळ | राजेश तायडे भुसावळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यानंतर या मतदारसंघातून निवडून आलेले संजय सावकारे आज मंत्रीपदावर विराजमान आहेत. मात्र, “मला जे सुख-वैभव मिळाले, ते महादेवाच्या आशीर्वादामुळे मिळाले”, या त्यांच्या कथित वक्तव्यामुळे आरक्षण, आंबेडकरी विचार आणि राजकीय प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावरून नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. सावकारेंच्या या वक्तव्यावर काही आंबेडकरी विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून…
-

हातउसनवारीच्या पैशांच्या वादातून बाप-लेकाला बेदम मारहाण; लोखंडी रॉडने हल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा
भुसावळ | राजेश तायडे हातउसनवारीने घेतलेल्या पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना भुसावळ शहरातील भोई नगर परिसरात घडली. या घटनेत बाप-लेकाला शिवीगाळ करत चापटबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच लोखंडी रॉडने प्रहार करून एकाला जखमी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पप्पू उर्फ उमेश रमेश भोई…
-

भुसावळात महावितरण कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू; डीएस कॉम्प्लेक्सजवळ मध्यरात्रीची घटना
भुसावळ | राजेश तायडे महावितरण कंपनीच्या वीजपुरवठा यंत्रणेतील बिघाड तपासण्यासाठी कर्तव्य बजावत असताना विजेचा जोरदार धक्का लागून ३५ वर्षीय कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भुसावळ शहरात घडली. वैभव पुरुषोत्तम दांडेकर (वय ३५, रा. गोरक्षण संस्था, जामनेर रोड, भुसावळ) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्टच्या मध्यरात्री महावितरणचे कर्मचारी अजय निवृत्ती चौधरी, दीपक लिधुरे…
-

खरगे यांच्या सभास्थळाचे गोमूत्राने शुद्धीकरण; भिमशक्ती संघटनेची भुसावळात तीव्र निदर्शने
भुसावळ |राजेश तायडे उत्तराखंडातील हल्द्वानी येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या जाहीर सभेनंतर सभास्थळाचे गोमूत्राने शुद्धीकरण करून हवन करण्यात आल्याच्या कथित प्रकाराचा भिमशक्ती सामाजिक संघटनेने तीव्र निषेध केला. या घटनेच्या निषेधार्थ भुसावळ येथे संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. दि. ८ ऑगस्ट रोजी हल्द्वानी येथे मल्लिकार्जुन खरगे यांची जाहीर सभा झाली होती. सभा संपल्यानंतर…
-

दाभोळकरांचा खून विज्ञानाच्या शस्त्राने; अंधश्रद्धेविरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्याचे आवाहन
भुसावळ | राजेश तायडे “विज्ञानवादी विचार सांगणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोळकरांचा खून कोणत्याही तंत्र-मंत्राने झाला नाही, तर विज्ञानाने तयार केलेल्या बंदुकीने त्यांचा खून करण्यात आला. यातच त्यांच्या मारेकऱ्यांचा खऱ्या अर्थाने पराभव आहे,” अशी परखड भूमिका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बाविस्कर यांनी मांडली. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात ते…
-

‘समझोता’च्या चर्चांना कुकरेजांचा सडेतोड जवाब!
“मी सत्याची लढाई लढतोय; माझा स्वाभिमान विकलेला नाही!” — मतानींच्या थकबाकी प्रकरणात तक्रारदाराचा स्पष्ट निर्धार जळगाव | The Citizen Mirror Legal Desk जळगाव महापालिकेच्या सेंट्रल फुले मार्केटमधील गाळ्याच्या कथित थकबाकीप्रकरणी स्वीकृत नगरसेवक रमेश मतानी यांच्याविरोधात तक्रारदार जितेंद्र प्रकाशलाल कुकरेजा यांनी केलेल्या तक्रारीची महसूल उपायुक्त धनश्री शिंदे यांच्याकडे सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यात…
Latest News

Stay Connected
Categories
Global news sports lifestyle Uncategorized गुन्हे, घात, अपघात जळगांव जीवनशैली & समाज (Lifestyle & Society) ताज्या बातम्या (Breaking News) दिवसातील ५ सर्वात मोठ्या बातम्या महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus) राजकारण & सत्ता (Politics & Power) व्यवसाय & अर्थव्यवस्था (Business & Economy) सरकारी योजना (Government Schemes)
Crime News India Breaking News Jalgaon News Maharashtra News Maharashtra Politics Maharashtra Prime Time Political News Maharashtra ई-केवायसी एकनाथ खडसे काँग्रेस गणेशोत्सव गिरीश महाजन चेतन झनके छत्रपती संभाजीनगर जळगाव जळगाव क्राईम जळगाव बातम्या जळगाव महानगरपालिका जळगाव राजकारण जळगाव शहर जितेंद्र कुकरेजा तहसीलदार थकबाकी प्रकरण दिल्ली आंदोलन देवेंद्र फडणवीस धनश्री शिंदे नंदुरबार नगरविकास विभाग नरेंद्र मोदी ना-देय प्रमाणपत्र भुसावळ महसूल विभाग महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्र शासन मुक्ताईनगर मुक्ताईनगर राजकारण यावल रमेश मतानी विद्यार्थी आंदोलन विधी विभाग शिक्षण व्यवस्था शिधापत्रिका सामाजिक न्याय सेंट्रल फुले मार्केट
You May Have Missed













