रेल्वे बोर्डाचे सदस्य पवन कुमार गुप्ता यांची भुसावळ DRM कार्यालयाला अचानक भेट; ऑल इंडिया SC-ST असोसिएशनतर्फे स्वागत

भुसावळ |राजेश तायडे भुसावळ रेल्वे विभागात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे आणि मुंबई रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक (GM) म्हणूनही जबाबदारी सांभाळलेले रेल्वे बोर्डाचे विद्यमान सदस्य पवन कुमार गुप्ता यांनी भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) कार्यालयाला अचानक सदिच्छा भेट दिली. त्यांच्या अनपेक्षित भेटीमुळे रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. पवन कुमार गुप्ता यांनी भुसावळ रेल्वे विभागात…

भुसावळ |राजेश तायडे

भुसावळ रेल्वे विभागात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे आणि मुंबई रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक (GM) म्हणूनही जबाबदारी सांभाळलेले रेल्वे बोर्डाचे विद्यमान सदस्य पवन कुमार गुप्ता यांनी भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) कार्यालयाला अचानक सदिच्छा भेट दिली. त्यांच्या अनपेक्षित भेटीमुळे रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

पवन कुमार गुप्ता यांनी भुसावळ रेल्वे विभागात कार्यरत असताना आपल्या कार्यशैलीने आणि प्रशासनिक कामगिरीने वेगळी ओळख निर्माण केली होती. भुसावळमधील यशस्वी कार्यकाळानंतर त्यांनी मुंबई रेल्वे विभागातही महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्याची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने त्यांची रेल्वे बोर्डाचे सदस्य म्हणून नियुक्ती केली.

गुप्ता यांच्या भुसावळ DRM कार्यालयातील आकस्मिक भेटीची माहिती ऑल इंडिया SC-ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनचे सुधीर पी. जंजाले यांना मिळताच त्यांनी सहकाऱ्यांसह तातडीने त्यांची भेट घेतली. यावेळी रेल्वे विभागाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुप्ता यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच रेल्वे बोर्डाच्या सदस्यपदावरील त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी रेल्वे SC-ST असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुधीर पी. जंजाले, मंडळ सचिव आर. सी. रावत, मंडळ कार्याध्यक्ष टी. बी. तायडे, मंडळ कोषाध्यक्ष पी. के. वर्मा, C&W ब्रांच अध्यक्ष विशाल तायडे आणि अनिल बिराडे यांच्यासह रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.

भुसावळ विभागाशी असलेले आपले जुने नाते जपत गुप्ता यांनी दिलेली ही अचानक भेट रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विशेष ठरली.

About the Author

Bharat Sasane Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

You May Have Missed