,

साप समोर आला अन् धाडसाची खरी परीक्षा; रोहिणी खडसेंनी स्वतः पकडला भला मोठा साप!

मुक्ताईनगर | The Citizen Mirror विशेष प्रतिनिधी साप विषारी असो वा बिनविषारी… समोर अचानक आला की भल्या-भल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. मात्र, सापाला सामोरे जाण्याची वेळ आली तेव्हा भीतीने मागे न हटता स्वतः पुढे जात भला मोठा साप पकडणाऱ्या रोहिणी खडसे यांच्या धाडसाची सध्या मुक्ताईनगरसह राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे…

मुक्ताईनगर | The Citizen Mirror विशेष प्रतिनिधी

साप विषारी असो वा बिनविषारी… समोर अचानक आला की भल्या-भल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. मात्र, सापाला सामोरे जाण्याची वेळ आली तेव्हा भीतीने मागे न हटता स्वतः पुढे जात भला मोठा साप पकडणाऱ्या रोहिणी खडसे यांच्या धाडसाची सध्या मुक्ताईनगरसह राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या आणि मुक्ताईनगरच्या राजकारणातील प्रमुख चेहरा असलेल्या रोहिणी खडसे यांच्या शेतात मोठा साप आढळून आला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी स्वतः पुढाकार घेत सापाला कोणतीही इजा न करता अत्यंत सावधपणे पकडले. त्यांच्या या कृतीतून केवळ धाडसच नव्हे, तर वन्यजीवांविषयीची संवेदनशीलताही दिसून आली.

बिबट्याच्या वेळी ‘फोटोसेशन’, सापाच्या वेळी प्रत्यक्ष धाडस?

काही महिन्यांपूर्वी मुक्ताईनगर बसस्थानक परिसरात बिबट्या शिरल्याने मोठी खळबळ उडाली होती. वनविभागाच्या पथकाने कारवाई करत बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन दिल्यानंतर त्याला पकडण्यात आले होते.

मात्र, या घटनेनंतर गुंगीत असलेल्या बिबट्याच्या पार्श्वभूमीवर फोटोसेशन करून धाडस दाखविण्याची चढाओढ पाहायला मिळाली होती. राजकीय प्रतिस्पर्ध्यांनीही या घटनेचा प्रसिद्धीसाठी वापर केल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. आमदार चंद्रकांत पाटील यांनीही गुंगीत असलेल्या बिबट्याला पकडतानाचे फोटो प्रसिद्ध केले होते.

पण साप गुंगीत नव्हता… आणि रोहिणी खडसेही मागे हटल्या नाहीत!

बिबट्याच्या घटनेच्या तुलनेत रोहिणी खडसेंच्या शेतातील प्रसंग वेगळा होता. समोर असलेला साप गुंगीत नव्हता; परिस्थिती पूर्णपणे नैसर्गिक आणि अनिश्चित होती.

अशा वेळी प्रसिद्धीसाठी दूर उभे राहण्याऐवजी रोहिणी खडसे यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि सापाला सुरक्षितपणे पकडले.

यामुळेच त्यांच्या या कृतीची तुलना आता पूर्वीच्या ‘फोटोसेशन’शी केली जात आहे.

धाडसासोबत वन्यजीव संवर्धनाचाही संदेश

साप पकडताना त्याला इजा न होऊ देणे हीदेखील महत्त्वाची बाब आहे. अनेकदा भीतीपोटी नागरिक सापाला मारण्याचा प्रयत्न करतात. मात्र, रोहिणी खडसे यांनी सापाला सुरक्षितपणे पकडून त्याचा जीव वाचवण्याला प्राधान्य दिले.

त्यामुळे त्यांच्या या कृतीकडे केवळ राजकीय चष्म्यातून न पाहता धाडस, प्रसंगावधान आणि वन्यजीवांविषयीची संवेदनशीलता या तिन्ही अंगांनी पाहिले जात आहे.

मुक्ताईनगरच्या राजकारणात रोहिणी खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष नवा नाही. मात्र, या घटनेने राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन ‘खरे धाडस नेमके कोणते?’ हा प्रश्न पुन्हा चर्चेत आणला आहे.

गुंगीत असलेल्या बिबट्यासोबत फोटो काढणे एक गोष्ट… पण कोणतीही खात्री नसताना समोर आलेल्या सापाला स्वतः पकडणे ही वेगळीच परीक्षा! रोहिणी खडसेंच्या या कृतीने सध्या मुक्ताईनगरच्या राजकीय चर्चेला एक वेगळाच विषय मिळाला आहे.

About the Author

Bharat Sasane Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

You May Have Missed