अभाविपच्या जळगाव महानगराची नवी कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी प्रा. डॉ. अमरदीप पाटील, मंत्रीपदी आर्यन भालशंकर

जळगाव | The Citizen Mirror अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) जळगाव महानगराच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा मुळजी जेठा महाविद्यालयातील सोहम सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. यावेळी जळगाव महानगरासह तीन नगरांच्या कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली. जळगाव महानगर अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. अमरदीप पाटील, तर महानगर मंत्री म्हणून आर्यन भालशंकर यांची घोषणा करण्यात आली. महानगर सहमंत्रीपदी मनोज कुंभारे…

जळगाव | The Citizen Mirror

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) जळगाव महानगराच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा मुळजी जेठा महाविद्यालयातील सोहम सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. यावेळी जळगाव महानगरासह तीन नगरांच्या कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली.

जळगाव महानगर अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. अमरदीप पाटील, तर महानगर मंत्री म्हणून आर्यन भालशंकर यांची घोषणा करण्यात आली. महानगर सहमंत्रीपदी मनोज कुंभारे आणि अंकुश सर्वेकर यांची निवड करण्यात आली.

तीन नगरांचीही नवी टीम

अभाविपच्या जळगाव महानगरांतर्गत विविध नगरांच्या पदाधिकाऱ्यांचीही घोषणा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज नगर अध्यक्षपदी प्रा. बिपाशा पात्रा आणि नगरमंत्रीपदी रमण चौधरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर अध्यक्षपदी प्रा. दीपक पाटील आणि नगरमंत्रीपदी ओम गुरव, तर विद्यापीठ नगर अध्यक्षपदी प्रा. प्रिती सोनी आणि नगरमंत्रीपदी आयुष महाजन यांची घोषणा करण्यात आली.

यासोबतच जळगाव महानगरातील १० महाविद्यालय अध्यक्षांचीही घोषणा करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार

यावेळी बोलताना देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे यांनी अभाविपच्या कार्याची भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थी परिषद ही केवळ संघटनात्मक काम करणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि समाजहितासाठी नेतृत्व घडविणारे व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले.

जळगाव महानगरातील नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून महाविद्यालयीन परिसरातील विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासोबतच विद्यार्थीहिताच्या विविध विषयांवर सातत्याने काम केले जाईल, असे त्यांनी नमूद केले. नव्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वातून जळगावमधील विद्यार्थी चळवळीला व्यापक आणि सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक महाविद्यालयापर्यंत संघटन पोहोचवण्याचा निर्धार

नवनिर्वाचित महानगर मंत्री आर्यन भालशंकर यांनी जळगाव महानगरातील प्रत्येक महाविद्यालयापर्यंत अभाविपचे संघटन पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने कार्य करताना त्यांना आपल्या समस्या मांडण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच महाविद्यालयांमध्ये सकारात्मक विद्यार्थी नेतृत्व उभे करण्यासाठी काम केले जाईल, असे भालशंकर यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे, प्रदेश संघटनमंत्री सिद्धेश्वर लटपटे, जळगाव विभाग संघटनमंत्री अजित केंद्रे, जिल्हा प्रमुख प्रा. डॉ. भूषण राजपूत यांच्यासह विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीहिताच्या प्रश्नांना अधिक आक्रमकपणे वाचा फोडत जळगाव महानगरातील विद्यार्थी चळवळीला बळकटी देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

About the Author

Bharat Sasane Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

You May Have Missed