महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त २५ पुस्तके प्रकाशित होणार; समता शिक्षक परिषद व समतावादी साहित्य मंडळाचा अभिनव उपक्रम

जळगाव येथे विशेष सभा; फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक व समतावादी विचारांवर आधारित पुस्तकांचे लेखन जळगाव | The Citizen Mirror महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद आणि समतावादी साहित्य मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील २५ शिक्षकांकडून महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित २५ पुस्तके प्रकाशित करण्याचा अभिनव उपक्रम हाती…

जळगाव येथे विशेष सभा; फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक व समतावादी विचारांवर आधारित पुस्तकांचे लेखन

जळगाव | The Citizen Mirror

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद आणि समतावादी साहित्य मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील २५ शिक्षकांकडून महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित २५ पुस्तके प्रकाशित करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पुस्तकांचा भव्य प्रकाशन सोहळा नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद व समतावादी साहित्य मंडळाची विशेष सभा १३ सप्टेंबर रोजी जळगाव येथे भाऊसाहेब राऊत विद्यालय संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

फुले विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न

सभेत बोलताना भरत शिरसाठ यांनी सांगितले की, केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या वतीने ११ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२७ हे वर्ष महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने विविध उपक्रमांनी साजरे केले जात आहे. या उपक्रमाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी समता शिक्षक परिषद आणि समतावादी साहित्य मंडळाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

महात्मा फुले यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि परिवर्तनवादी कार्य अधिक व्यापकपणे समाजापर्यंत पोहोचावे, या उद्देशाने २५ शिक्षक विविध विषयांवर पुस्तके लिहिणार आहेत. नोव्हेंबरमध्ये एकाच मंचावर या २५ पुस्तकांचे प्रकाशन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

यापूर्वी समतावादी साहित्य मंडळाच्या वतीने २०२२ मध्ये एकाच वेळी १४ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर आता २५ पुस्तके प्रकाशित करण्याचा उपक्रम महाराष्ट्रातील उल्लेखनीय उपक्रम ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

सामाजिक समता ते शेतकरी विचार; विविध विषयांवर लेखन

सभेत उपस्थित २५ लेखकांनी आपल्या पुस्तकांचे विषय जाहीर केले. यामध्ये महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, सत्यशोधक समाज, सार्वजनिक सत्यधर्म, मानवतावादी विचार, शेतकऱ्यांसंदर्भातील विचार, अभिप्रेत शिक्षण पद्धती, उद्योजक म्हणून महात्मा फुले, महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले, स्त्री उद्धारक महात्मा फुले, कौटुंबिक संघर्ष आणि सामाजिक समता यांसह विविध विषयांचा समावेश आहे.

या माध्यमातून महात्मा फुले यांच्या विचारांचा आजच्या सामाजिक व शैक्षणिक संदर्भात अभ्यास करून तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

उपक्रमशील शिक्षक पुरस्काराबाबतही चर्चा

समता शिक्षक परिषदेकडून दरवर्षी उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कार देण्यात येतात. यंदाच्या पुरस्कार नियोजनाबाबतही सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी ‘समतांगण’ विशेषांकाच्या संपादन समिती प्रमुखपदी अजय भामरे, अर्थ समिती प्रमुखपदी सौ. प्रतिभा पाटील, तर कार्यक्रम नियोजन समिती प्रमुखपदी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष रणजित सोनवणे यांची निवड करण्यात आली.

पदाधिकारी व शिक्षकांची उपस्थिती

सभेत धनराज मोतीराय आण्णा, सेवानिवृत्त प्राचार्य यशवंतराव मोरे, साहेबराव बागुल, साळवा हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर मोरे, पिंपळगाव हायस्कूलचे पर्यवेक्षक प्रेमसिंग जाधव, जिजामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण केदार, डॉ. प्रदीप सुरवाडकर, प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब जगताप, जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब सोनवणे, धामणगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक हेमेंद्र सपकाळे, जिल्हाध्यक्षा वर्षा अहिरराव, भारती ठाकरे, प्रतिभा जाधव, सरिता वासवानी, डॉ. चित्रा पगारे, शैला जाधव, चेतन नवगीरे, निलेश सोनवणे, मनोज बिऱ्हाडे, महेश तायडे, राजेंद्र पाटील, कपिल देशमुख यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

संघटनेचे सरचिटणीस सोपान भवरे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. रणजित सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले, तर जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब सोनवणे यांनी आभार मानले.

About the Author

Bharat Sasane Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

You May Have Missed