गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘दारू’चा धिंगाणा; १० वाहनचालकांवर कारवाईचा बडगा

जळगाव शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई; मोटार वाहन कायद्यातील कलम १८५ अन्वये न्यायालयीन कारवाई जळगाव | राजेश तायडे|The Citizen Mirror गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर जळगाव शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. दारू पिऊन ट्रॅक्टर तसेच इतर वाहने चालविल्याप्रकरणी तब्बल १० वाहनचालकांवर मोटार वाहन…

जळगाव शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई; मोटार वाहन कायद्यातील कलम १८५ अन्वये न्यायालयीन कारवाई

जळगाव | राजेश तायडे|The Citizen Mirror

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर जळगाव शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. दारू पिऊन ट्रॅक्टर तसेच इतर वाहने चालविल्याप्रकरणी तब्बल १० वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यातील कलम १८५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडावी, यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखेकडून विशेष बंदोबस्त आणि वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. गणेशोत्सवापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत मिरवणुकीदरम्यान दारू पिऊन वाहन चालवू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.

नेमकं काय घडलं?

२५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत नेहरू चौक परिसरातून गणेश विसर्जन मिरवणुका सुरू असताना शहर वाहतूक शाखेच्या पथकाने वाहनांची तपासणी केली.या तपासणीदरम्यान काही ट्रॅक्टर आणि इतर वाहनांचे चालक मद्यप्राशन करून वाहन चालवित असल्याचे निदर्शनास आले. मिरवणुकीत लहान मुले, महिला आणि नागरिकांची मोठी गर्दी असताना मद्यप्राशन करून ट्रॅक्टर अथवा इतर वाहने चालविण्याचा प्रकार समोर आल्याने पोलिसांनी संबंधित चालकांवर तातडीने कारवाई केली.मद्यप्राशन करून वाहन चालविल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधित वाहनचालकांविरोधात मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये कारवाई करण्यात आली असून, पुढील न्यायालयीन कारवाईसाठी प्रकरणे सादर करण्यात येत आहेत.

कारवाई झालेल्या वाहनचालकांची नावे

पोलिसांच्या पत्रानुसार कारवाई करण्यात आलेल्या वाहनचालकांमध्ये पुढील चालकांचा समावेश आहे :-

१)विशाल शांताराम बाविसकर, वय २०, रा. ममुराबाद — ट्रॅक्टर

२)गोलू सुनील कोळी, वय २६, रा. वाल्मिकी नगर, जैनाबाद — अशोक लेलँड

३)दीपक रमेश पंडित, वय ३२, रा. दत्तमंदिर, शनिपेठ — स्वराज ट्रॅक्टर

४)मधुर भगतसिंग सोनवणे, वय २८, रा. नेरी, ता. जामनेर — स्वराज ट्रॅक्टर

५)पंकज आत्माराम माळी, वय ३२, रा. लाकडपेठ, शिवाजीनगर — स्वराज ट्रॅक्टर

६)रिंकू ऊर्फ राकेश संजय गरुड, रा. मनुदेवी मंदिर रोड, अयोध्यानगर — टाटा क्रेन

७)सदानंद गजानन गवळी, रा. शनिपेठ, गवळीवाडा — टाटा मॅजिक

८)हरिओम संतोष चौधरी, रा. पाळधी, ता. धरणगाव — स्वराज ट्रॅक्टर

९)किरण दिलीप नन्नवरे, वय २६, रा. आडगाव — स्वराज ट्रॅक्टर

१०)समाधान चिंतामण धनगर, वय ३४, रा. यावल — पॅजो लाइटिंग वाहन

पोलिसांच्या पत्रानुसार, यातील काही वाहने गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होती.

पोलिसांचा स्पष्ट इशारा

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गवित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्या आदेशानुसार संबंधित वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
सण-उत्सवाच्या काळात दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा वाहतूक शाखेने दिला आहे.

गर्दीच्या मिरवणुकीत मद्यप्राशन करून वाहन चालविणे धोकादायक

गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘दारू’चा धिंगाणा; १० वाहनचालकांवर कारवाईचा बडगाजळगाव शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई; मोटार वाहन कायद्यातील कलम १८५ अन्वये न्यायालयीन कारवाईजळगाव | The Citizen Mirror Political & Civic Deskगणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर जळगाव शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. दारू पिऊन ट्रॅक्टर तसेच इतर वाहने चालविल्याप्रकरणी तब्बल १० वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यातील कलम १८५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडावी, यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखेकडून विशेष बंदोबस्त आणि वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. गणेशोत्सवापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत मिरवणुकीदरम्यान दारू पिऊन वाहन चालवू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.नेमकं काय घडलं?२५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत नेहरू चौक परिसरातून गणेश विसर्जन मिरवणुका सुरू असताना शहर वाहतूक शाखेच्या पथकाने वाहनांची तपासणी केली.या तपासणीदरम्यान काही ट्रॅक्टर आणि इतर वाहनांचे चालक मद्यप्राशन करून वाहन चालवित असल्याचे निदर्शनास आले. मिरवणुकीत लहान मुले, महिला आणि नागरिकांची मोठी गर्दी असताना मद्यप्राशन करून ट्रॅक्टर अथवा इतर वाहने चालविण्याचा प्रकार समोर आल्याने पोलिसांनी संबंधित चालकांवर तातडीने कारवाई केली.मद्यप्राशन करून वाहन चालविल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधित वाहनचालकांविरोधात मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये कारवाई करण्यात आली असून, पुढील न्यायालयीन कारवाईसाठी प्रकरणे सादर करण्यात येत आहेत.कारवाई झालेल्या वाहनचालकांची नावेपोलिसांच्या पत्रानुसार कारवाई करण्यात आलेल्या वाहनचालकांमध्ये पुढील चालकांचा समावेश आहे—1. विशाल शांताराम बाविसकर, वय २०, रा. ममुराबाद — ट्रॅक्टर2. गोलू सुनील कोळी, वय २६, रा. वाल्मिकी नगर, जैनाबाद — अशोक लेलँड3. दीपक रमेश पंडित, वय ३२, रा. दत्तमंदिर, शनिपेठ — स्वराज ट्रॅक्टर4. मधुर भगतसिंग सोनवणे, वय २८, रा. नेरी, ता. जामनेर — स्वराज ट्रॅक्टर5. पंकज आत्माराम माळी, वय ३२, रा. लाकडपेठ, शिवाजीनगर — स्वराज ट्रॅक्टर6. रिंकू ऊर्फ राकेश संजय गरुड, रा. मनुदेवी मंदिर रोड, अयोध्यानगर — टाटा क्रेन7. सदानंद गजानन गवळी, रा. शनिपेठ, गवळीवाडा — टाटा मॅजिक8. हरिओम संतोष चौधरी, रा. पाळधी, ता. धरणगाव — स्वराज ट्रॅक्टर9. किरण दिलीप नन्नवरे, वय २६, रा. आडगाव — स्वराज ट्रॅक्टर10. समाधान चिंतामण धनगर, वय ३४, रा. यावल — पॅजो लाइटिंग वाहनपोलिसांच्या पत्रानुसार, यातील काही वाहने गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होती.पोलिसांचा स्पष्ट इशारापोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गवित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्या आदेशानुसार संबंधित वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.सण-उत्सवाच्या काळात दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा वाहतूक शाखेने दिला आहे.गर्दीच्या मिरवणुकीत मद्यप्राशन करून वाहन चालविणे धोकादायकगणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होतात. ट्रॅक्टर, क्रेन, लाइटिंग वाहने आणि इतर वाहनांचीही मिरवणुकीत मोठी संख्या असते. अशा परिस्थितीत चालकाने मद्यप्राशन केलेले असल्यास वाहनावरील नियंत्रण सुटण्याचा धोका वाढतो.त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर करण्यात आलेली ही कारवाई नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे. संबंधित प्रकरणांमध्ये आता न्यायालयीन प्रक्रियेत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.The Citizen Mirror | नागरिकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांवर थेट नजर.

गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होतात. ट्रॅक्टर, क्रेन, लाइटिंग वाहने आणि इतर वाहनांचीही मिरवणुकीत मोठी संख्या असते. अशा परिस्थितीत चालकाने मद्यप्राशन केलेले असल्यास वाहनावरील नियंत्रण सुटण्याचा धोका वाढतो.त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर करण्यात आलेली ही कारवाई नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे. संबंधित प्रकरणांमध्ये आता न्यायालयीन प्रक्रियेत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.

About the Author

Bharat Sasane Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

You May Have Missed