,

धक्कादायक! जळगावातून २ हजारांहून अधिक अल्पवयीन बेपत्ता; ९५ मुलींचा अजूनही पत्ता नाही, मानवी तस्करीची भीती

बहुतांश मुलांचा पोलिसांनी शोध लावला; मात्र ९५ अल्पवयीन मुलींचा तपास अजूनही सुरू, मानवी तस्करीच्या शक्यतेने वाढली चिंता. जळगाव | The Citizen Mirror Desk जळगाव जिल्ह्यातील अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता होण्याच्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांत २ हजारांहून अधिक अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यापैकी बहुतांश मुलांचा शोध पोलिसांनी…

बहुतांश मुलांचा पोलिसांनी शोध लावला; मात्र ९५ अल्पवयीन मुलींचा तपास अजूनही सुरू, मानवी तस्करीच्या शक्यतेने वाढली चिंता.

जळगाव | The Citizen Mirror Desk

जळगाव जिल्ह्यातील अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता होण्याच्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांत २ हजारांहून अधिक अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यापैकी बहुतांश मुलांचा शोध पोलिसांनी यशस्वीपणे लावला असला, तरी ९५ अल्पवयीन मुली आजही बेपत्ता असून त्यांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.या प्रकरणांमध्ये पोलिसांकडून सातत्याने तपास सुरू असून, विविध राज्यांतील पोलिसांशी समन्वय साधला जात आहे. बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके, तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, नातेवाईक व परिचितांची चौकशी तसेच विविध यंत्रणांची मदत घेतली जात आहे. तरीही ९५ मुलींचा शोध अद्याप लागलेला नसल्याने चिंता अधिकच वाढली आहे.दरम्यान, काही सामाजिक संघटना आणि तज्ज्ञांनी या प्रकरणांमध्ये मानवी तस्करीची शक्यता फेटाळून लावता येत नसल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे प्रत्येक बेपत्ता प्रकरणाचा सखोल तपास करून आवश्यक ते धागेदोरे शोधण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.पोलिस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाल्यास तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी. तसेच संशयास्पद हालचाली, व्यक्ती किंवा माहिती आढळल्यास ती तत्काळ पोलिसांना कळवावी, जेणेकरून बेपत्ता मुलांचा शोध अधिक वेगाने घेता येईल.जळगावातील बेपत्ता अल्पवयीनांचा हा वाढता आकडा केवळ कायदा-सुव्यवस्थेचाच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी चिंतेचा विषय बनला असून, उर्वरित ९५ मुलींचा सुरक्षित शोध लागण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About the Author

Bharat Sasane Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

You May Have Missed