,

छापा देहव्यापारावर, उलगडा बांगलादेश कनेक्शनचा; जळगावात बनावट आधारकार्ड रॅकेटची शक्यता

जळगाव | प्रतिनिधी जळगाव तालुका पोलिसांनी कथित देहव्यापार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यानंतर तपासाला धक्कादायक वळण मिळाले आहे. कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या एका महिलेची ओळख बांगलादेशी नागरिक म्हणून समोर आली असून तिच्याकडे बनावट आधारकार्ड आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातून मानवी तस्करी, बेकायदेशीर घुसखोरी आणि बनावट कागदपत्रांच्या रॅकेटचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव…

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव तालुका पोलिसांनी कथित देहव्यापार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यानंतर तपासाला धक्कादायक वळण मिळाले आहे. कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या एका महिलेची ओळख बांगलादेशी नागरिक म्हणून समोर आली असून तिच्याकडे बनावट आधारकार्ड आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातून मानवी तस्करी, बेकायदेशीर घुसखोरी आणि बनावट कागदपत्रांच्या रॅकेटचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरालगतच्या निमखेडी रोड परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली, तर संबंधित आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या महिलांची चौकशी सुरू असताना एका महिलेच्या कागदपत्रांबाबत संशय निर्माण झाला. तिच्याकडे असलेल्या आधारकार्डाची पडताळणी केली असता ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी अधिक सखोल तपास सुरू केला. मोबाईल फोनमधील माहिती, संपर्क क्रमांक आणि इतर पुराव्यांच्या आधारे संबंधित महिला मूळची बांगलादेशातील असल्याचे समोर आले.

तपासात तिची खरी ओळख जाकिया अबुल काहेर फोकर (वय २८) अशी उघड झाली असून ती बांगलादेशातील खुलना परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. बनावट आधारकार्डाच्या आधारे ती भारतात वास्तव्यास होती का, तिला हे कागदपत्र कोणी उपलब्ध करून दिले आणि तिचा मानवी तस्करीच्या जाळ्याशी काही संबंध आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

या प्रकरणानंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून बनावट ओळखपत्र तयार करून देणाऱ्या संभाव्य रॅकेटचा शोध सुरू केला आहे. तसेच संबंधित महिलेच्या भारतातील संपर्कांची माहिती गोळा करण्यात येत आहे. आर्थिक व्यवहार, कॉल डिटेल्स आणि सोशल मीडिया खात्यांचीही तपासणी केली जात आहे.

दरम्यान, एका देहव्यापारविरोधी कारवाईतून थेट बांगलादेश कनेक्शन समोर आल्याने सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. या प्रकरणातून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असून तपास वेगाने सुरू आहे.

About the Author

Bharat Sasane Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

View All

You May Have Missed