,

“मोदींना ठार मारण्याची उघड धमकी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी खळबळ; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर”

सोशल मीडियावरील एका पोस्टने उडवली खळबळ; धमकी देणाऱ्याचा शोध सुरू, ऑस्ट्रेलियन पोलिसांचा मोठा तपास मुंबई|The Citizen Mirror Desk पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी सोशल मीडियावरून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. मेलबर्नमध्ये होणाऱ्या भारतीय समुदायाच्या कार्यक्रमाशी संबंधित पोस्टवर एका अज्ञात व्यक्तीने थेट हल्ल्याची भाषा वापरत धमकी दिली. हा…

सोशल मीडियावरील एका पोस्टने उडवली खळबळ; धमकी देणाऱ्याचा शोध सुरू, ऑस्ट्रेलियन पोलिसांचा मोठा तपास

मुंबई|The Citizen Mirror Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी सोशल मीडियावरून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. मेलबर्नमध्ये होणाऱ्या भारतीय समुदायाच्या कार्यक्रमाशी संबंधित पोस्टवर एका अज्ञात व्यक्तीने थेट हल्ल्याची भाषा वापरत धमकी दिली. हा संदेश व्हायरल होताच ऑस्ट्रेलियन सुरक्षा यंत्रणा आणि फेडरल पोलिस तातडीने सक्रिय झाले आहेत.धमकीच्या संदेशात पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियात “मृत्यूसाठी येत आहेत” अशा स्वरूपाची अत्यंत गंभीर आणि आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती. या पोस्टची माहिती समोर येताच ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांनी सायबर तपास सुरू केला असून, संबंधित सोशल मीडिया खात्याचा आयपी अ‍ॅड्रेस आणि धमकीमागील व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ ते ११ जुलैदरम्यान इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. ऑस्ट्रेलियात ते पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा करणार असून, मेलबर्नमध्ये भारतीय समुदायाच्या भव्य कार्यक्रमालाही संबोधित करणार आहेत.या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. परदेशी राष्ट्रप्रमुखांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या धमकीकडे शून्य सहनशीलतेच्या भूमिकेतून पाहिले जाईल, असे ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, धमकी देणाऱ्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.

About the Author

Bharat Sasane Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

You May Have Missed