भुसावळात महावितरण कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू; डीएस कॉम्प्लेक्सजवळ मध्यरात्रीची घटना

भुसावळ | राजेश तायडे महावितरण कंपनीच्या वीजपुरवठा यंत्रणेतील बिघाड तपासण्यासाठी कर्तव्य बजावत असताना विजेचा जोरदार धक्का लागून ३५ वर्षीय कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भुसावळ शहरात घडली. वैभव पुरुषोत्तम दांडेकर (वय ३५, रा. गोरक्षण संस्था, जामनेर रोड, भुसावळ) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्टच्या मध्यरात्री महावितरणचे कर्मचारी अजय निवृत्ती चौधरी, दीपक लिधुरे…

भुसावळ | राजेश तायडे

महावितरण कंपनीच्या वीजपुरवठा यंत्रणेतील बिघाड तपासण्यासाठी कर्तव्य बजावत असताना विजेचा जोरदार धक्का लागून ३५ वर्षीय कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भुसावळ शहरात घडली. वैभव पुरुषोत्तम दांडेकर (वय ३५, रा. गोरक्षण संस्था, जामनेर रोड, भुसावळ) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्टच्या मध्यरात्री महावितरणचे कर्मचारी अजय निवृत्ती चौधरी, दीपक लिधुरे आणि वैभव दांडेकर हे डीएस ग्राउंड परिसरात पेट्रोलिंग करत होते. रात्री सुमारे १२ ते १२.२० वाजेच्या दरम्यान परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार प्राप्त झाली.

यानंतर रात्री सुमारे १ वाजता गांधी पुतळा चौकातील डीएस कॉम्प्लेक्सजवळील ११ केव्ही कटपॉईंट खांबावर फॉल्ट शोधण्यासाठी वैभव दांडेकर इमारतीच्या वरच्या मजल्यावर गेले. फॉल्ट तपासत असतानाच अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते खाली कोसळले.

घटनेनंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने महावितरणचे सहाय्यक अभियंता अजय गावंडे यांना माहिती दिली. माहिती मिळताच गावंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी वैभव दांडेकर यांना तातडीने भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेने महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठ्यातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी प्रत्यक्ष धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

About the Author

Bharat Sasane Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

You May Have Missed