We're open Closes at 5:00 pm

हरिपुरा येथे उत्साहात साजरा झाला जागतिक आदिवासी दिन; हक्क, परंपरा आणि रोजगार योजनांवर मार्गदर्शन

फैजपूर | सलिम पिंजारी जागतिक आदिवासी दिनानिमित्त हरिपुरा, ता. यावल येथे विविध उपक्रम आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करून आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी समाजाचे हक्क, परंपरा, सामाजिक योगदान आणि विकासाच्या संधी यावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील पोलीस पाटील होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, रोजगार सेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस,…

फैजपूर | सलिम पिंजारी

जागतिक आदिवासी दिनानिमित्त हरिपुरा, ता. यावल येथे विविध उपक्रम आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करून आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी समाजाचे हक्क, परंपरा, सामाजिक योगदान आणि विकासाच्या संधी यावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील पोलीस पाटील होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, रोजगार सेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस, पशुसखी, बचत गट सीआरपी तसेच यंग नेटवर्क फाऊंडेशनचे स्वयंसेवक उपस्थित होते. गावातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घेतला.

आदिवासी समाजाच्या हक्कांवर मार्गदर्शन

कार्यक्रमात जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना आदिवासी समाजाच्या हक्कांसोबतच त्यांच्या समृद्ध परंपरा, संस्कृती आणि सामाजिक विकासातील योगदानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

रोजगार योजनांची ग्रामस्थांना माहिती

दरम्यान, रोजगार सेवकांनी ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘विकसित भारत जी-राम-जी’ योजनेबाबत ग्रामस्थांना सविस्तर माहिती दिली. जॉब कार्ड नोंदणीची प्रक्रिया, रोजगार हमी योजनेचे फायदे तसेच उपलब्ध रोजगाराच्या संधी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

रोजगार हमी योजनेअंतर्गत हरिपुरा परिसरात लवकरच नवीन कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यामुळे स्थानिक नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधींबाबतही ग्रामस्थांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.

योजनांची माहिती घेण्यासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांनी विविध शासकीय योजनांबाबत प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. रोजगार, जॉब कार्ड आणि रोजगार हमी योजनेशी संबंधित माहिती नागरिकांपर्यंत पोहोचल्याने कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला कर्मचारी, स्वयंसेवक आणि विविध घटकांच्या सहभागामुळे हरिपुरा येथील जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

About the Author

Bharat Sasane Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News