Opening soon Opens today at 9:00 am

कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांना ‘राजपूत समाज भूषण पुरस्कार’ प्रदान

फैजपूर | सलिम पिंजारी शिक्षण, समाजसेवा, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील इंग्रजी विभागप्रमुख तसेच राष्ट्रीय छात्र सेना (NCC) अधिकारी कॅप्टन डॉ. राजेंद्र रघुनाथ राजपूत यांना ‘राजपूत समाज भूषण पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महाराष्ट्र…

फैजपूर | सलिम पिंजारी

शिक्षण, समाजसेवा, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील इंग्रजी विभागप्रमुख तसेच राष्ट्रीय छात्र सेना (NCC) अधिकारी कॅप्टन डॉ. राजेंद्र रघुनाथ राजपूत यांना ‘राजपूत समाज भूषण पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.


श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा ॲड. शीला सुखदेवसिंह गोगामेडी, राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेंद्रसिंह कट्यार यांच्या हस्ते तसेच परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या आशीर्वादाने हा सन्मान प्रदान करण्यात आला.


यावेळी विलासदादा पाटील, दामोदर राजपूत, डॉ. विश्वजित सिसोदिया, विठ्ठलसिंग मोरे तसेच राष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांना यापूर्वीही सर्वोत्कृष्ट NCC अधिकारी पुरस्कार, उत्कृष्ट जिल्हास्तरीय करिअर कट्टा समन्वयक पुरस्कार, मिर्झा गालिब पुरस्कार आणि सकाळ गौरवगाथा पुरस्कार यांसारख्या विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.


पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी सांगितले की, “हा सन्मान समाजाप्रती केलेल्या कार्याची पावती असून भविष्यात अधिक जोमाने समाजसेवा करण्याची प्रेरणा या पुरस्कारामुळे मिळाली आहे.”


या यशाबद्दल तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष शिरीषदादा चौधरी, प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, उपप्राचार्य, संचालक मंडळ, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

About the Author

Bharat Sasane Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News