मुंबई | The Citizen Mirror Desk
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सततची धावपळ, कामाचा वाढता ताण, ताप आणि अशक्तपणा यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीनुसार, शिंदे यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना काही दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली राजकीय बैठका, दौरे आणि प्रशासकीय कामांचा ताण त्यांच्या प्रकृतीवर परिणामकारक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सध्या शिंदे यांच्या प्रकृतीबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले असून, उपचारानंतर त्यांना लवकरच घरी सोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
The Citizen Mirror त्यांच्या प्रकृतीबाबतचे अधिकृत अपडेट्स वाचकांपर्यंत सातत्याने पोहोचवत राहील.














