खरगे यांच्या सभास्थळाचे गोमूत्राने शुद्धीकरण; भिमशक्ती संघटनेची भुसावळात तीव्र निदर्शने

भुसावळ |राजेश तायडे उत्तराखंडातील हल्द्वानी येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या जाहीर सभेनंतर सभास्थळाचे गोमूत्राने शुद्धीकरण करून हवन करण्यात आल्याच्या कथित प्रकाराचा भिमशक्ती सामाजिक संघटनेने तीव्र निषेध केला. या घटनेच्या निषेधार्थ भुसावळ येथे संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. दि. ८ ऑगस्ट रोजी हल्द्वानी येथे मल्लिकार्जुन खरगे यांची जाहीर सभा झाली होती. सभा संपल्यानंतर…

भुसावळ |राजेश तायडे

उत्तराखंडातील हल्द्वानी येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या जाहीर सभेनंतर सभास्थळाचे गोमूत्राने शुद्धीकरण करून हवन करण्यात आल्याच्या कथित प्रकाराचा भिमशक्ती सामाजिक संघटनेने तीव्र निषेध केला. या घटनेच्या निषेधार्थ भुसावळ येथे संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

दि. ८ ऑगस्ट रोजी हल्द्वानी येथे मल्लिकार्जुन खरगे यांची जाहीर सभा झाली होती. सभा संपल्यानंतर काही व्यक्तींनी सभास्थळाचे गोमूत्राने शुद्धीकरण केल्याचा आणि त्यानंतर हवन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे सामाजिक सलोखा आणि संविधानिक मूल्यांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे भिमशक्ती संघटनेने म्हटले आहे.

भिमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी भूमिका संघटनेने मांडली.

महाराष्ट्र सचिव तसेच रेल्वे एसी/एसटी संघटनेचे माजी अध्यक्ष सुधीर जंजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष सुनील जवरे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन पटाव, जिल्हा उपाध्यक्ष सागर कुरेशी, शहराध्यक्ष विनोद पवार, संजयदादा तायडे, भिमशक्ती सफाई कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील कंडेरे, सादिक भाई, शांताराम नरवाडे, देविदास बागुल, रामदास भिल, विकी खरारे, रामावतार परदेशी, भरत तायडे, मुकेश वानखेडे, महेंद्र जवरे, गौतम सुरवाडे, जितेंद्र जंजाळे, संदेश भालेराव यांच्यासह कार्यकर्त्यांनी निदर्शनात सहभाग घेतला.

संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा’

सभास्थळाचे शुद्धीकरण आणि हवन केल्याच्या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, तसेच त्यांना अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. संविधानाने दिलेल्या समानता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

About the Author

Bharat Sasane Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

You May Have Missed