‘वीज बचतीचा’ उपदेश जनतेला… पण कार्यालयात दिवे-पंखे सुरूच! महावितरणच्या जळगाव कार्यालयातील निष्काळजीपणा चर्चेत

जळगाव | प्रतिनिधी एकीकडे नागरिकांना वीज बचतीचे आवाहन करणारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) आणि दुसरीकडे स्वतःच्या कार्यालयातच वीज बचतीच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र जळगाव शहरातील दिक्षित वाडी येथील महावितरण कार्यालयात पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या जेवणाच्या वेळेत कार्यालयातील कर्मचारी लंचसाठी बाहेर गेले होते. त्या वेळी कार्यालयात कोणताही कर्मचारी उपस्थित नसतानाही अनेक ठिकाणी…

जळगाव | प्रतिनिधी

एकीकडे नागरिकांना वीज बचतीचे आवाहन करणारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) आणि दुसरीकडे स्वतःच्या कार्यालयातच वीज बचतीच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र जळगाव शहरातील दिक्षित वाडी येथील महावितरण कार्यालयात पाहायला मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या जेवणाच्या वेळेत कार्यालयातील कर्मचारी लंचसाठी बाहेर गेले होते. त्या वेळी कार्यालयात कोणताही कर्मचारी उपस्थित नसतानाही अनेक ठिकाणी दिवे आणि पंखे सुरूच असल्याचे दिसून आले. कार्यालय रिकामे असतानाही वीज उपकरणे सुरू ठेवण्यात आल्याने महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, महावितरणकडून वेळोवेळी ग्राहकांना वीज बचतीबाबत जनजागृती केली जाते. “अनावश्यक दिवे-पंखे बंद ठेवा”, “ऊर्जेची बचत म्हणजेच राष्ट्राची बचत” असे संदेश दिले जातात. मात्र, हेच नियम स्वतःच्या कार्यालयात पाळले जात नसतील, तर नागरिकांना दिल्या जाणाऱ्या संदेशांची विश्वासार्हता कमी होते, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

वीज निर्मितीसाठी मोठा खर्च होत असताना आणि ऊर्जा बचतीवर शासनाचा भर असताना, सरकारी कार्यालयांमध्ये अशा प्रकारे वीज वाया जाणे ही गंभीर बाब मानली जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी करून अशा निष्काळजीपणावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

दरम्यान, हा प्रकार संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर याबाबत कोणती कारवाई करण्यात येणार, याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे. कार्यालयीन शिस्त आणि ऊर्जा बचतीचे नियम सर्वप्रथम सरकारी कार्यालयांनीच काटेकोरपणे पाळणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

About the Author

Bharat Sasane Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

You May Have Missed