,

उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरवादींचा एल्गार; जळगाव जिल्ह्यातून हजारोंचा मुंबईवर मोर्चा!

३० जूनला मंत्रालयावर लाखोंचा महामोर्चा; भुसावळ जिल्हास्तरीय बैठकीत मोठा निर्धार भुसावळ | प्रतिनिधी अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात जळगाव जिल्ह्यातील आंबेडकरवादी संघटना आक्रमक झाल्या असून, ३० जून रोजी मुंबईतील मंत्रालयावर निघणाऱ्या लाखोंच्या महामोर्चात जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा निर्धार भुसावळ येथे झालेल्या संयुक्त जिल्हास्तरीय बैठकीत व्यक्त करण्यात आला. भुसावळ येथील मैत्रेय बुद्ध विहार येथे पूर्व…

३० जूनला मंत्रालयावर लाखोंचा महामोर्चा; भुसावळ जिल्हास्तरीय बैठकीत मोठा निर्धार

भुसावळ | प्रतिनिधी

अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात जळगाव जिल्ह्यातील आंबेडकरवादी संघटना आक्रमक झाल्या असून, ३० जून रोजी मुंबईतील मंत्रालयावर निघणाऱ्या लाखोंच्या महामोर्चात जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा निर्धार भुसावळ येथे झालेल्या संयुक्त जिल्हास्तरीय बैठकीत व्यक्त करण्यात आला.

भुसावळ येथील मैत्रेय बुद्ध विहार येथे पूर्व भारतीय बौद्ध महासभा, महिला विभाग तसेच विविध समविचारी आंबेडकरवादी संघटना आणि राजकीय पक्षांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बैठकीत “अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण रद्द करा आणि संवैधानिक अनुसूचित जातींच्या सूचीत कोणताही बदल करू नका” या मागणीवर एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष सुमंगल (रवींद्र) अहिरे गुरुजी होते. तर महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. के. वाय. सुरवाडे गुरुजी आणि राज्यसंघटक लताताई तायडे यांनी मार्गदर्शन करत संविधानाने दिलेल्या आरक्षण व्यवस्थेत कोणताही हस्तक्षेप स्वीकारला जाणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली.

या महामोर्चाचे नेतृत्व भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, सरसेनानी आनंदराज आंबेडकर, आमदार राजकुमार बडोले आणि माजी मंत्री बबनराव घोलप करणार असून, राज्यभरातून लाखो आंबेडकरवादी मंत्रालयावर धडक देणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

जिल्ह्यातून हजारोंच्या सहभागाचे नियोजन

बैठकीत जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून मोर्चासाठी किती कार्यकर्ते सहभागी होतील, याचे सविस्तर नियोजन करण्यात आले. वाहतूक व्यवस्था, जनजागृती, संघटनात्मक समन्वय आणि आंदोलनाची रणनीती यावर विस्तृत चर्चा झाली. ३० जूनचा मोर्चा ऐतिहासिक करण्यासाठी प्रत्येक गावातून जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

यांची होती प्रमुख उपस्थिती

बैठकीस रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, एससी-एसटी रेल्वे असोसिएशनचे माजी अध्यक्ष शांताराम जाधव, डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय साळवे, भुसावळ मंडळ अध्यक्ष वाल्मिकी देहाडे, प्रकाश सरदार, विश्वास कदम, गणेश जाधव, महिला विभागाच्या जिल्हाध्यक्ष प्रियंका अहिरे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रा. डॉ. संजीव साळवे, तसेच विविध तालुका शाखांचे पदाधिकारी, समता सैनिक दलाचे अधिकारी, महिला प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्रिसरण-पंचशीलने बैठकीची सुरुवात, गुणवंत शिक्षकांचा सत्कार

बैठकीची सुरुवात त्रिसरण-पंचशील स्वीकारून करण्यात आली. त्यानंतर नुकतेच केंद्रीय शिक्षक-शिक्षिका पात्रता परीक्षा (CTET) उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जिल्हा सरचिटणीस सुशीलकुमार हिवाळे यांनी केले.बैठकीच्या शेवटी संविधान, आरक्षण आणि अनुसूचित जातींच्या मूळ संवैधानिक संरचनेचे संरक्षण करण्यासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

About the Author

Bharat Sasane Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

You May Have Missed